SBI SO recruitment 2020 : परीक्षेशिवाय असे होईल सिलेक्शन, करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने स्पेशल कॅडर ऑफिसर पदांसाठी भरतीकरता अर्ज मागवले आहेत. बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख, 13 जुलै आहे.

एकुण 20 पदांसाठी भरती होणार आहे, जी विविध श्रेणीमध्ये वेगवेगळी करण्यात आली आहेत. बँकेने याबाबत एक सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, नोकरीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना आयडी प्रूफ, वयाचा दाखला, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रमाणपत्र यासारखे कागदपत्र द्यावे लागतील.

कागदपत्रांच्या पडताळणीशिवाय शॉर्टलिस्टिंग पूर्णपणे मान्य होणार नाही. सर्व कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीच्यावेळी केली जाईल आणि उमेदवाराला त्याचवेळी मुळ कागदपत्रे देण्यासाठी सांगण्यात येईल.

एसबीआय एसओ भरती 2020 : पात्रता निकष

वय : अर्जदाराचे वय किमान 25 असावे आणि ते 35 वर्षापेक्षा जास्त असू नये. वयाची मोजणी 1 जानेवारी, 2020 पर्यंत केली जाईल.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमधून सीए / एमबीए (अर्थ) / पीजीडीएम (अर्थ) / पीजीडीबीएम (अर्थ) किंवा कोणतीही समकक्ष पदव्यूत्तर पदवी पास हवा.

उमेदवाराकडे एक ईमेल आयडी असावा, जो निकालापर्यंत सक्रिय ठेवावा लागेल. या ईमेलच्या माध्यमातून कॉल लेटर / मुलाखतीची तरीख, याबाबत माहिती दिली जाईल. उमेदवार केवळ बँकेत उपलब्ध लिंकच्या माध्यमातून स्वताला नोंदणीकृत करू शकतात.

एसबीआय एसओ भरती 2020 : शुल्क
अर्ज शुल्क जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीच्या उमेदवारांसाठी 750 रूपये आहे. शुल्क इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा उपयोग करून भरता येईल. अनुसूचित जाती / जमाती किंवा पीडब्ल्यूडीशी संबंधीत उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

एसबीआय एसओ भरती 2020 : वेतन
अंतिम निवड झालेल्या उमेदवारास 42,020 रुपये ते 51,490 रुपयांपर्यंत वेतन मिळेल. अधिकारी डीए, एचआरए, सीसीए, पीएफ, कंट्रीब्यूटरी पेन्शन फंड, एलएफसी, मेडिकल फॅसिलिटी इत्यादीसाठी पात्र असेल.

एसबीआय एसओ भरती 2020 : निवडीचे नियम
नोकरीसाठी निवड होण्यासाठी, उमेदवाराला कोणत्याही लेखी परीक्षेला उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. बँकेद्वारे गठित एक शॉर्टलिस्टिंग कमेटी पॅरामीटर्स ठरवेल. यानंतर बँकेद्वारे ठरवलेल्या उमेदवारांच्या योग्य संख्येला शॉर्टलिस्ट करून इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल. मुलाखत 100 गुणांची असणार आहे.