जम्मूमधील ग्रेनेड हल्ल्यातील मृतांची संख्या वाढली

ADV

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू बस स्टँडवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका दहशतवाद्यास अटक केली आहे.

जम्मूच्या मध्यवर्ती भागांतील अत्यंत गजबजलेल्या बस स्थानकावर गुरुवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यात दोन युवक मरण पावले , तर किमान ३२ जण जखमी झाले आहेत. जम्मू बस स्थानकावर दहशतवाद्यांनी याआधीही अनेकदा बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. दहा महिन्यांतला हा तिसरा हल्ला आहे. याआधीही दहशतवाद्यांनी अनेकदा बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

हल्लेखोर अटकेत –

पोलीस महासंचालक मनिष सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हिजबुल मुजाहीद्दीन’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. हिजबुलचा दहशतवादी फारुख अहमद भट उर्फ ओमर याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. भट हा ‘हिजबुल मुजाहीद्दीन’चा कुलमर्थ जिल्ह्याचा कमांडर आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

सहा वाहनांची तोडफोड, एक बस पेटवली

Women’s Day : केवळ महिलांची प्रमुख भूमिका असलेले ‘हे’ चित्रपट ठरले सुपरहिट

महिलेने घातला ज्येष्ठ नागरिकाला २९ लाखाला गंडा

SBI ची मोठी ऑफर ; ‘या’ ग्राहकांना मिळणार दुप्पट व्याज

‘मध्यस्थांच्या यादीत तटस्थ लोकांना घ्या’; रवीशंकर यांच्या नावाला ओवेसींचा विरोध