बहुगुणी आहे सुगंधी नीलगिरी तेल 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नीलगिरी या वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात. संधिवातावर नीलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात. भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी नीलगिरी तेलाचा उपयोग होतो. श्‍वासनलिकेचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे. नाकाच्या तक्रारींमध्ये नीलगिरी तेल उपयोगी आहे. नीलगिरीची मुळे रेचक आहेत.

खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असते. ‘मिटरेसी’ कुळातील सदापर्णी, सुगंधी, उंच अशा वनस्पतींपैकी नीलगिरी ही उबदार प्रदेशातील वनस्पती आहे. नीलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो. श्‍वासनलिकेच्या वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यांवर नीलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होते.