‘कोरोना व्हायरस’चा प्रकोप रोखण्यासाठी केवळ 2 तासच झोपते ‘ही’ वैज्ञानिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक महिला शास्त्रज्ञ जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून लोकांना वाचविण्यासाठी रात्रंदिवस सतत काम करत आहे. स्कॉटलंड येथे राहणार्‍या या महिला शास्त्रज्ञाचे नाव डॉ. केट ब्रोडरिक असून कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लस शोधण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. ब्रोडरिक रात्री केवळ 2 तासच झोपतात.

ब्रोडरिक सुमारे 20 वर्षांपासून धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठी लस तयार करण्याचे काम करत आहेत. त्यांना इबोला, झिका सारख्या आजारांना रोखण्यासाठी औषध तयार करण्यात यश आले आहे.

डॉ. ब्रॉडरिक यांनी सांगितले की, त्यांना वाटते की त्यांच्यावर ही जबाबदारी असून हे काम लवकर पुर्ण करावे लागणार आहे. सध्या त्या उंदीर आणि डुकरावर या लशीचा प्रयोग करत आहेत.

त्यांनी सांगितले की, मी आयुष्यभर केवळ बदल घडवण्यासाठी झटत आहे. आता कोणत्याही परिस्थितीत कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस तयार करायची आहे.

अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सोबत काम करणार्‍या डॉ. ब्रॉडरिक यांच्याकडे संशोधनासाठी एक टीम आहे. त्यांनी सांगितले की सध्या त्यांना रात्री केवळ 2 तास झोप मिळते.

दोन मुलांच्या माता असलेल्या डॉ. ब्रॉडरिक यांनी सांगितले की, त्या सुट्टीवर असताना त्यांना चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरस पसरत असल्याची माहिती मिळाली. चीनी अधिकार्‍यांनी कोरोना व्हायरसचा जेनेटिक कोड जारी करताच डॉ. ब्रॉडरिक यांनी 3 तासांच्या आत एक लस तयार केली.

त्यांनी म्हटले की, व्हॅक्सीन डिझाईनच्या दुसर्‍या दिवशी ती लस त्यांनी फॅक्टरीत पाठवून दिली. डॉ. ब्रॉडरिक यांच्या टीमला बिल गेट्स समर्थक एका संस्थेकडून निधी सुद्धा मिळाला आहे.