SEBI | एका SMS ने करू शकता आधार-पॅन लिंक, जाणून घ्या असे करण्याचे आहेत कोणते फायदे

नवी दिल्ली : SEBI | भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI) ने गुंतवणुकदारांना 30 सप्टेंबरपर्यंत पॅनसोबत आधार लिंक करण्यास सांगितले आहे. सेबीनुसार जर असे केले नाही तर गुंतवणुकदारांचे पैसे अडकू शकतात. पॅन अमान्य घोषित केले जाईल, ज्यामुळे त्यांना ट्रांजक्शन करण्यात समस्या येऊ शकतात. पॅन-आधार तुम्ही एका एसएमएसने लिंक करू शकता, ही पद्धत जाणून घेवूयात…

एसएमएसने असे करा आधार-पॅन लिंक

यासाठी फोनमध्ये मोठ्या अक्षरांमध्ये UIDPN टाइप करून एक स्पेस द्या. यानंतर आधार नंबर टाइप करा. यानंतर पुन्हा एकदा स्पेस द्या आणि पॅन नंबर टाइप करा. उदाहरणार्थ UIDPN -space- Aadhar no. Pan no. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. यानंतर आधार-पॅन लिंक होईल.

लिकिंगचे हे आहेत फायदे

– पॅन निष्क्रिय होणार नाही. पॅन निष्क्रिय झाले नाही तर पैसेही अडकणार नाहीत.

– बँक अकाऊंट सुद्धा फ्रीज होणार नाही.

– जे लिंकिंग करणार नाहीत त्यांना जास्त टीडीएस भरावा लागेल.

– शेयर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आधार-पॅन लिंकिंग आवश्यक आहे.

– आधार-पैन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. यानंतर विलंब शुल्क भरावे लागू शकते.

हे देखील वाचा

Chakan Crime | चाकण पोलिसांचा ‘व्हिडिओ गेम’ जुगार अड्ड्यावर छापा, 7 जणांवर FIR

PM Kisan Yojana | अर्जात ‘ही’ चूक करतात शेतकरी, दरवर्षी 6 हजार रुपये पाहिजेत तर जाणून घ्या अटी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  SEBI | aadhar pan link can be done with an sms know what are the benefits of doing so

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update