Video : सोनाक्षी सिन्हाच्या ‘खानदानी शफाखाना’चा दुसरा ट्रेलर ‘आउट’!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अदाकारा सोनाक्षी सिन्हाचा आगामी सिनेमा ‘खानदानी शफाखाना’चा पहिला ट्रेलर रिलीज प्रेक्षकांना खूप आवडला होता. यानंतर आता या सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या मेकर्सने हा ट्रेलर ‘बात तो करो’ अशा नावाने रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, सोनाक्षी आपल्या अंकलचं सेक्स क्लिनीक चालवत आहे. तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यात सोनाक्षीचा संघर्ष दिसत आहे.

एका छोट्या शहरात कोणत्याही ट्रेनिंगशिवाय सोनाक्षी ‘सेक्स क्लिनिक’ चावलताना दिसते. यावेळी सोनाक्षीला अनेक अडचणी येतात. हे सगळं आपल्याला ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. तिला सोसायटीसोबतच कायद्याचाही सामना करावा लागतो. या ट्रेलरमध्ये वरुण शर्मा आणि रॅपर बादशाह सोबतच अन्नू कपूर आणि प्रियांश जोरा हेदेखील दिसत आहेत.

खानदानी शफाखानचं दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता करत आहेत. हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. परिणिती चोपडा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘जबरिया जोडी’ हा सिनेमादेखील २ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. खानदानी शफाखाना या सिनेमाव्यतिरीक्त सोनाक्षी सिन्हा अक्षय कुमारच्या मिशन मंगल या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती सलमान खानच्या दबंग ३ या सिनेमातही दिसणार आहे.

खानदानी शफाखाना या सिनेमात सोनाक्षी सिन्हाने बेबी बेदीची भूमिका साकारली आहे जी एक सेक्सोलॉजिस्ट आहे. वरुण शर्माने सोनाक्षीच्या भावाची भूमिका साकारली आहे. रॅपर बादशाह या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात डेब्यू करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त