न्यायाधीशाच्या खुर्चीवर काढली सेल्फी, प्रशिक्षणार्थी पोलिसाला अटक

मध्य प्रदेश (उमारिया) : वृत्तसंस्था

न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढणे एका प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.मध्य प्रदेशमधील उमारिया येथील जिल्हा सत्र न्यायालयातील मुख्य न्यायाधीश के पी सिंह यांचे कोर्टरुम शनिवारी सकाळी बंद होते. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या खूर्चीवर बसून सेल्फी काढला. याप्रकरणी त्या कर्मचाऱ्याला अटक करणयात आली असून या गुन्ह्यात दोषी आढळल्यास त्याला एक वर्षाचा तुरूंगवास,दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेशातील उमारिया येथील जिल्हा सत्र न्यायालयातील मुख्य न्यायाधीश के. पी. सिंह यांचे कोर्टरुम शनिवारी सकाळी बंद होते. दरम्यान प्रशिक्षणार्थी पोलीस काॅन्स्टेबल राम अवतार रावत त्या ठिकाणावरुन जात होता. कार्टरुमध्ये कोणीही नसल्याचे बघून राम रावतला न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्याने खुर्चीवर बसून फोटो काढण्यास सुरूवात केली. त्याच वेळी कोर्टातील कर्मचारी तिथे पोहचला. त्याने रावतला फोटो काढण्यास विरोध केला. तरी देखील रावतने कोर्ट कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. मी पोलीस असून मला कोणी रोखू शकत नाही असे त्याने यावेळी सांगितले.

[amazon_link asins=’B0796RZNWN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ecbbd4e-7dcc-11e8-8ec5-ef35d969e5f3′]

सदर प्रकरणी घटनेची माहिती मिळताच अखेर त्या प्रशिक्षणार्थी काॅन्स्टेबलला अटक केली. काही वेळात त्याला जामीन मंजूर झाला. बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.