चायनीज फटाक्यांवर पुर्णपणे बंदी, उल्लंघन करणार्‍यांना दंड, ‘स्वदेशी’ची विक्री वाढणार !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – दिवाळीत मोठ्या प्रमाणात चीनी फटाके विकले जातात, परंतू दिवाळी जवळ येताच आता या फटाक्यांशी संबंधित कठोर दिशानिर्देश प्रशासनाने जारी केले आहेत. विशेष करुन चीनी फटाक्यावर प्रशासनाने प्रतिबंध आणले आहेत. चीनी फटाके विक्रीवर सीमा शुल्क आयुक्तांनी बंदी आणली आहे. तरीही कोणी चीनी फटाके विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात येईल.


सीमा शुल्क विभागाचे प्रमुख आयुक्तांनी सांगितले की देशात चीनी फटाके आयातीवर प्रतिबंध आहे आणि जर कोणताही व्यक्ती यासंबंधित व्यवसाय करतो किंवा चीनी फटाके ठेवल्यास, विकल्यास, लपवल्यास किंवा खरेदी केल्यास त्यांना अधिनियम 1962 अंतर्गत दंडित करण्यात येईल.

चीनी वस्तूंच्या विक्रीवर दिवाळीत बंदी आणण्यासाठी आणि स्वदेशीला प्रोस्ताहन देण्यासाठी अनेक संस्थांनी पावले उचलली होती. त्याला आता प्रशासनाकडून देखील साथ मिळाली आहे. यामुळे स्वदेशी वस्तूंची मागणी वाढेल. यासाठी अधिनियम 1962 नुसार चीनी फटाके विक्री, बाळगणे, खरेदी करणे अशा प्रकारांवर दंड ठोठावण्यात येईल.

Visit : Policenama.com