Senior Citizen Saving Scheme | बचत योजनांमधून मिळत असेल लाखो रुपयांचे व्याज, तर जाणून घ्या केव्हा आणि कसे वाचू शकता टॅक्स कपातीपासून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizen) ही विशेष बातमी आहे. पोस्ट ऑफिस Senior Citizen Saving Scheme म्हणजे SCSS मध्ये गुंतवणूक करणार्‍या ज्येष्ठ ग्राहकांनी वेळीच काही फॉर्म भरले तर टॅक्स कपात म्हणजे TDS (Tax Deduction at Source) पासून वाचता येऊ शकते.

 

जर तुमच्या घरात सुद्धा एखाद्या ज्येष्ठाने आपल्या निवृत्ती फंडचे लाखो रुपये किंवा दुसरी मोठी रक्कम SCSS मध्ये लावली असेल तर त्यांच्यासाठी टॅक्स कपातीपासून वाचण्याचा चांगला उपाय आहे. SCSS मध्ये ठराविक मर्यादेपर्यंतच्या रक्कमेनंतर टॅक्स लागतो.

 

डिपार्टमेंट ऑफ पोस्टनुसार त्यांच्याकडे अशा तक्रारी आल्या होत्या की, Form 15G/15H जमा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या व्याजाच्या रक्कमेतून TDS कापण्यात आला आहे. यासाठी सर्कलने आवश्यक कारवाई केली पाहिजे. यासाठी डिपार्टमेंट ऑफ पोस्टने एक गाईडलाईन जारी केली आहे. (Senior Citizen Saving Scheme)

 

असा आहे विभागाचा आदेश

 

 • Tax सूट तेव्हाच लागू होईल जेव्हा खाते 15G/15H सह सीड केले जाते.
 • जेव्हा SCSS खातेधारक फॉर्म 15जी/15एच जमा करतो, तेव्हा संबंधित पोस्ट ऑफिस हे ठरवेल की ग्राहकांच्या सीआयएफ आणि एससीएसएस खात्यात माहिती खाली दिलेल्या सूचीत ठरवलेली आहे.
 • सर्व सीबीएस पोस्ट कार्यालये हे ठरवतील की, अगोदरपासून प्राप्त सर्व फॉर्म 15जी/15एच फिनेकलमध्ये अपडेट केले आहेत, कारण टीडीएस कपात सीआयएफ आणि खाते स्तरात उपलब्ध माहितीवर आधारित आहे.
 • एससीएसएस खातेधारकांच्या सीआयएफला वैध पॅनसोबत जोडले पाहिजे.
 • TDS कोड SCSS खातेधारकांसाठी CIF स्तरात संरचित केला आहे.
  हा केवळ टीडीएसएनआर/टीडीएसएनएस असावा, NOTAX च्या रूपात नसावा.
 • कर दायित्वाची गणना ग्राहकाचे वय आणि आर्थिक वर्षासाठी देय व्याजावर केली जाईल.
 • TDS कोड नोटॅक्स/टीडीएसएनआर ग्राहकाच्या 60 वर्ष वयापर्यंत पोहचण्याच्या तारखेला बॅच प्रक्रियाद्वारे टीडीएसएनएसच्या रूपात परिवर्तित केले जाईल.
 • जर पॅन अमान्य आहे, तर फिनेकलमध्ये बॅच प्रक्रियाद्वारे टीडीएस कोड एनओपीएएन/एनओपीएनएसच्या रूपात परिवर्तित केले जाईल.
 • खातेधारकाकडून फॉर्म प्राप्त होण्याच्या तारखेला फॉर्म 15जी/15एच अपडेट केला पाहिजे.
 • 15G/15H ला CSCAM मेनूचा वापर करून अपडेट केले पाहिजे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पडताळणी केली पाहिजे.
 • एकदा 15G/15H नोंद केल्यानंतर, खाते स्तरावर कर श्रेणी ’कोणताही कर नाही’ मध्ये अपडेट होईल.

 

Web Title : Senior Citizen Saving Scheme | senior citizen saving scheme deduction non deduction of tax deduction at source in scss accounts in post offices

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bhumi Pednekar | भूमी पेडणेकरच्या ‘या’ मोहक फोटोंमुळे चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील चोरीला गेलेले ‘स्पिकर’ 18 लाखांचे; बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध, चौकशी CBI कडे सोपवा’