कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची निर्मीती करण्यात आली. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदलून आलेल्या कमकुवत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुणे शहर आणि ग्रामीणच्या अती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दमबाजी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामीणचे पोलीस अधिक्षक आणि पुणे शहर मधील काही वरिष्ठ अधिकारी पिंपरी आयुक्तालयात नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक भेटी घेऊन त्यांना दमबाजी करत असल्याचा दावा केला आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eadbfc83-aab8-11e8-a1ff-277c7acc9c44′]

शहर आणि ग्रामीण पोलिसदलाचे विभाजन करून नव्याने कार्यान्वित झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालया विरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिस असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. पिंपरी आयुक्तालय कार्यान्वित होण्याच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या बदल्या बेकायदा असल्याचा थेट पवित्रा पिंपरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ‘पुण्यात जाऊ नका. माझा तुमच्यावर वॉच आहे’, अशा शब्दांत पोलिसांना जाहीर तंबी देण्यात आली आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये घमासान

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील उपायुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना शनिवारी (दि. २५) बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना न सोडण्याची तंबी थेट ‘वायरलेस सेट’वरून देण्यात आली आहे. शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘वायरलेस सेट’वर उपस्थित राहण्यास सांगितले होते. या वेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या मनुष्यबळाविषयी पोलिस महासंचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0eb3b55c-aab9-11e8-9404-bbe59aba3f24′]

‘पुणे शहर व ग्रामीण पोलिसांनी १ ऑगस्टनंतर बदली केलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिस दलातून सोडण्यात येऊ नये. हे सर्व अधिकारी-कर्मचारी हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा भाग आहेत. त्यांना सोडायचे असेल तर संबंधितांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधावा. परस्पर कुठल्याही अधिकारी-कर्मचाऱ्याला त्या बदलीच्या आदेशाचा भाग म्हणून सोडण्यात येऊ नये,’ अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित होण्यापूर्वी सर्वसाधरण बदल्या या मे महिन्याच्या अखेरीस झाल्या. त्या वेळी १ ऑगस्टला अनेकांची नियुक्ती ही पिंपरी-चिंचवडमधील आठ पोलिस ठाण्यात झाली. तर ग्रामीण पोलिस प्रमुखांनी विनंती आणि प्रशासकीय बदल्या करताना नव्या आयुक्तालयाला जोडलेल्या देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी, चाकण या ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. नवे आयुक्तालय हे १५ ऑगस्टला कार्यान्वित झाले. परंतु, १४ ऑगस्टला नव्याने काही बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या बेकायदा असून, प्रलोभनांसह येथील कर्मचारी-अधिकाऱ्यांना दमदाटी करून पुण्यात नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी धमकाविण्यात येत असल्याचा दावा वायरलेस सेटवरून केला आहे.

पिंपरी-चिंचवड मध्ये रिक्षा अपघातात तीन विद्यार्थी जखमी

पुणे : माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन विद्रोही कवीला अटक