home page top 1

शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळाची मागणी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या वीज समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जा मंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
[amazon_link asins=’B00WJI8L1G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6aefc13c-8444-11e8-a134-711ec9d223b0′]

शहरातील नागरिकांना वीज समस्यासाठी पुणे शहरात जवळपास १० किमी दूर जावे लागते. सध्या शहरात उच्चदाब ग्राहक व लघुदाब ग्राहक सुमारे (LT ग्राहक 6013117, HT- 972) 602289 आहेत. दोन लाख ग्राहकांना एक विभागीय कार्यालय यानुसार शहराची तीन वीज वितरण विभागीय कार्यालयाची गरज आहे. तीन विभागीय कार्यालयांसाठी एक मंडळ कार्यालय या प्रमाणे पिंपरी चिंचवड शहराला वीज अधिकारी कर्मचारी व कार्यालये यांची पुनर्र्चना करणे आवश्यक आहे. भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकवस्ती वाढत आहे. पुढील काळात ही ग्राहकसंख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही रचना करणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी वीजवितरण कार्यालयांची पुनर्र्चना करून शहरासाठी स्वतंत्र मंडळ कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जा मंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.

Loading...
You might also like