धक्कादायक ! तरुणीवर तब्बल 60 जणांनी केला 30 दिवस बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर तब्बल 60 जणांनी 30 दिवस तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना झारखंडच्या जमशेदपूरमध्ये घडली आहे. तरुणीच्या शरीरावर असंख्य जखमा आढळून आल्या आहेत.

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे अपहरण करून तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. त्यानंतर तरुणी नशेत राहावी यासाठी तिला सातत्याने इंजेक्शन दिले जात होते. तब्बल एक महिना हा प्रकार सुरु होता. त्याचवेळी 60 जणांनी महिनाभर तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने महिन्याभरानंतर तिथून पळ काढत आपली सुटका करून घेतली. पीडितेला पाहिल्यावर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतले. पीडित तरुणीच्या शरीरावर इंजेक्शनमुळे असंख्य जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. बलात्कार करणाऱ्यांना विरोध केला असता त्यांनी मारहाण केल्याची माहिती देखील तरुणीने पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून काहींची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.