पुण्यातील ‘मेराकी स्पा’ मधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

४ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा परिसरातील मेराकी स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रविवारी दुपारी छापा घालून ४ तरुणींची सुटका केली असून स्पा चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हिना अकबर सैय्यद (३०, वडगाव शेरी) हिच्यावर पीटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील हयात रिजेन्सी हॉटेलशेजारी असलेल्या प्लॅटीनम स्क्वेअर इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर मेराकी स्पा आहे. या स्पा मध्ये महिलांना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून मसाज पार्लरच्या नावाखाली देह विक्री करून घेतली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी येथे छापा घातला. त्यावेळी तेथून ४ तरुणींची सुटका करण्यात आली. तसेच रॅकेट चालविणाऱ्या हिना अकबर सैय्यद हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुटका करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी रेस्क्यू होममध्ये करण्यात आली आहे.