चिंचवड येथील ‘स्पा ग्लो’ या मसाज सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे ः पोलीसनामा ऑनलाइन

पिंपरी-चिंचवड परिसरातील चिंचवडगाव येथील गावडे बिल्डींगमध्ये चालु असलेल्या ‘स्पा ग्लो’ या समाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करून पोलिसांनी 3 सज्ञान मुलींची सुटका केली आहे.

अविनाश देविदास जोगदंड (22, रा. रूम नंबर 114, सिध्दार्थ हौसींग सोसायटी, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील आणि पोलिस कर्मचारी नितीन लोंढे यांना चिंचवडगावातील ‘स्पा ग्लो’ या समाज सेंटरमध्ये अविनाश जोगदंड हे सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली.

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रमोद म्हेत्रे, नितीन तरटे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, नितीन लोंढे, नितीन तेलंगे, संदीप गायकवाड, सचिन शिंदे, महिला गितांजली जाधव, कविता नलावडे, ननिता येळे, सुप्रिया शेवाळे आणि रूपाली चांदगुडे यांच्या पथकाने शुक्रवारी ‘स्पा ग्लो’ या समाज सेंटरवर अचानकपणे छापा टाकला. त्यावेळी तेथे एक नेपाळ देशाची आणि 2 पुणे शहरातील सज्ञान मुली आढळुन आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका करून ‘स्पा ग्लो’ या समाज सेंटरचा मालकाला अटक केली आहे.

चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे आणि गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही संयुक्‍तरित्या कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान 2 मोबाईल, हिशोबाच्या डायर्‍या, रोख 5 हजार 500 रूपये आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला आहे.