VIDEO : बिग बी आणि जीनत अमान यांच्या ‘या’ गाण्यावरील मुलींचा SEXY बेली डान्स VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ट अभिनेत्री जीनत अमान यांच्या एका गाण्याचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, काही मुली या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहेत. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे 1979 साली आलेल्या द ग्रेट गॅम्बलर या सिनेमातील असून हे गाणं त्यावेळी चांगलंच गाजलं होतं. आजही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला मुलींच्या बेली डान्सचा व्हिडीओ आहे.

https://youtu.be/nTvIPF7rMxs

सहा मुलींनी मिळून या गाण्यावर ग्रुप डान्स केला आहे. मुलींनी केलेला हॉट आणि सेक्सी बेली डान्स् मात्र प्रेक्षकांना भावताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोकांना हा व्हिडीओ चांगलाच आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी मुलींच्या या बेली डान्सचे कौतुक केले आहे.

सहाही मुलींनी एकाच प्रकारची वेशभुषा केली आहे. सर्वच मुलीच हॉट आणि बोल्ड अवतारात दिसत आहेत. त्यांचा बोल्ड अवतार आणि सेक्सी मोहक असा बेली डान्स ते ही एका अमिताभ यांच्या प्रसिद्ध गाण्यावर, सर्वांचे मन जिंकताना दिसत आहे.