काश्मीरमध्ये काहीतरी ‘अघटित’ घडणार असल्यानेच अतिरिक्‍त ‘फोर्स’ : शाह फैसल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएएएस अधिकारी आणि जम्मू-कश्मीर पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैसल यांनी जम्मू काश्मीरमध्ये काहीतरी अघटित घडणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी यावर चिंता देखील व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या अतिरिक्त सुरक्षा बलांमुळे त्यांनी हि चिंता आणि भीती व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले कि, केंद्र सरकारच्या या निर्णयामागे काहीतरी मोठा उद्देश असून अघटित घडणार आहे.

शाह फैसल यांचे ट्वीट

शाह फैसल यांनी ट्विट करत म्हटले कि, अचानक सुरक्षा दलांच्या १०० तुकड्या तैनात करण्यामागे काय नियोजन आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले कि, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमध्ये काही तरी अघटित घडणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. शुक्रवारी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये
सीआरपीएफच्या ५०, बीएसएफच्या १०, एसएसबीच्या ३०, आईटीबीपीच्या १० तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

https://twitter.com/shahfaesal/status/1154802324314869762

१५ ऑगस्टच्या पार्श्ववभूमीवर दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याने सावधानता म्हणून गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. दहशहतवाद्यांच्या पूर्वीच्या घटना पाहून यावेळी केंद्र सरकारने कोणतीही जोखीम न पत्करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या सीझफायरच्या उल्लंघनामुळे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत होत असते. त्यामुळे केंद्र सरकार यावेळी कडक पावले उचलणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –