Shah Rukh Khan | अभिनेत्रीने शाहरुखला लगावल्या होत्या एका मागून एक कानशिलात

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किंग खान 31 वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या दरम्यान त्याचे अनेकदा अपघात देखील झाले असून त्याला अभिनेत्रींचा मार देखील खावा लागला आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) व अभिनेत्री सुचित्रा कृष्णामूर्ति (Suchitra Krishnamoorthi) यांनी हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचा ‘कभी हां कभी ना’ (Kabhi Haan Kabhi Naa) या कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटातील गाण्यांनी लोकांना अक्षरश: वेड लावले होते. मात्र शुटिंग दरम्यान अभिनेत्री सुचित्राने शाहरुखला (Shah Rukh Khan) खूप कानशिलात लगावल्या होत्या व नंतर ती सेटवर रडत बसली होती.

अभिनेता शाहरुख खानने प्रत्येक चित्रपटात त्याच्या अनोख्या स्टाईलने व अभिनयाने त्याचे वेगळेपण सिद्ध केले. (Shah Rukh Khan Hit Movies) त्याचा 1994 साली आलेला ‘कभी हां कभी ना’ चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. मात्र यामधील ‘ऐ काश के हम’ (Ae Kash Ke Hum Song) या गाण्यांच्या शुटिंग दरम्यान शाहरुख खूप मार खावा लागला होता. या गाण्यानंतर सुनील या कानाखाली मारण्याचा सीन होता. तो शुट करत असताना पहिला टेक झाला मात्र त्याने दिग्दर्शक खुष नव्हते. त्यामुळे या सीनचे अनेक रिटेक झाले. सीनमध्ये जीवंतपणा यावा म्हणून अभिनेत्री सुचित्राला अनेकवेळा शाहरुखला थप्पड मारावी लागली.

एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री सुचित्रा कृष्णामूर्तीने या चित्रपटाच्या शुटिंगचे किस्से शेअर केले. यावेळी तिने सांगितले की, ‘ए काश के हम’ या गाण्यानंतर आयनाला सुनीलला थप्पड मारावी लागली. पण पहिल्या टेकमध्ये थप्पड नीट बसली नाही, त्यानंतर अनेक टेक घेण्यात आले. यामुळे त्याला शाहरुखला अनेक वेळा थप्पड खावी लागली आणि त्यापैकी एकही खोटी नव्हता. सगळ्या त्याला जोगजोरात बसत होत्या. यावेळी मला शाहरुखला (SRK) मारायचे होते म्हणून मी रडायला लागले. मी एकामागून एक मल्टिपल टेक देत होते. मला हे यापुढे करायचे नव्हते. आम्ही नाटक-अभिनय केला नाही. खरेखुरे मी शाहरुखला खूप मारले. मात्र तो, सज्जनासारखा काही बोलला नाही पण तो मागे जात असल्याचे मला दिसत होते.

1994 साली आलेली ‘कभी हा कभी ना’ हा चित्रपट कुंदन शहा (Kundan Shah) यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात शाहरुख (Shah Rukh Khan) व सुचित्रा कृष्णामूर्ती मुख्य भूमिका साकारत होते. त्याचबरोबर नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), सतीश शाह (Satish Shah) यांच्या देखील भूमिका होत्या. चित्रपटाची बजेट अत्यंत कमी होते मात्र चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता व चित्रपटातील गाणी गाजली होती.

Web Title :  Shah Rukh Khan | kabhi haan kabhi naa suchitra krishnamoorthi recalls slapping shah rukh khan numerous times

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध