Shahajibapu Patil | ‘ठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, कोणी पोराने ती वापरू नये’; शहाजीबापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कॉपी करुन आलेले डुप्लीकेट नेतृत्व कधीही टिकत नसते. ठाकरी भाषा फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभत होती. कोणी पोराने ती वापरू नये, असे म्हणत शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी थेट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वावर प्रश्न उभा केला आहे. तसेच आम्ही धनुष्यबाणावरच (Dhanushya Ban Symbol) सर्व निवडणुका (Elections) लढवणार असून त्यांनी हवे तर ढाल तलवार चिन्ह घेऊन लढावे आपल्याकडे शस्त्रांचा काय तोटा आहे का असा टोला लगावला. घ्या चिन्ह आणि या मैदानात असे आव्हान शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले.

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) सुरु असून याला मोठा प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या भाषेबाबत उलटसुलट चर्चा सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे भाषा ही फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, कोणाही पाराने ती वापरु नये असा सणसणीत टोला शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. वारंवार आदित्य ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांना गद्दार असं संबोधत असल्याने संतापलेल्या पाटील (Shahajibapu Patil) यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे.

 

वेडेवाकडे बोलणे बंद नाही झाले तर…
आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्याचे नातू म्हणून राज्यभर फिरत आहेत. ते लोकमतातले नेतृत्व म्हणून फिरत नाहीत. त्यांच्या नावामागे असलेले ठाकरे नाव काढले तर ते 50 लोकांची सभा देखील घेऊ शकणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. एका बाजूला गद्दार म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला या या कशाला म्हणायचे, असा सवाल देखील शहाजीबापूंनी उपस्थित केला. आता आमच्यकडे तुमचे काय काम, कोण येणार नाही. आम्ही ठाकरे कुटुंबाचा आदर करतो, मातोश्रीबाबत आम्हाला प्रेम आहे म्हणून आम्ही ऐकून घेत आहोत पण आता वेडेवाकडे बोलणे बंद नाही झाले तर आम्हालाही उलट्या बाजूने उत्तर द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

कसे बोलावे हे घरातून संस्कार मिळाले नाहीत का?
जगात कोणतेही डुप्लिकेट नेतृत्व टिकले नाही. तुम्हाला वारसा म्हणून आलेले नेतृत्व शिवसैनिकांनी स्विकारले आहे. तुम्ही एखादा ठाकरी शब्द वापरला तर तो जिव्हारी लागणार नाही परंतु आदित्य सारख्या लहान पोराने ही भाषा वापरणे योग्य नाही. सर्व आमदारांची वये मोठी आहेत. मोठ्या माणसांना कसे बोलावे याचे संस्कार घरातून मिळाले नाहीत का? असा सवाल पाटील यांनी विचारला.

 

पोस्टरवर उद्धव ठाकरे ऐवजी शिंदेंचा फोटो
सर्व निवडणुका शिवसेना (Shivsena) भाजप (BJP) एकत्रित लढणार असून यावेळी उद्धव ठाकरे
यांच्या ऐवजी पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो असेल असा खुलासाही शहाजीबापू यांनी केला.
आम्ही धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार असून त्यांनी हवे तर ढाल तलवार चिन्ह घेऊन लढावे आपल्याकडे शस्त्रांचा काय तोटा आहे
का असा टोलाही लगावला. घ्या चिन्ह आणि या मैदानात असे आव्हान पाटील यानी दिले आहे.

 

Web Title :- Shahajibapu Patil | shahajibapu patil slams aaditya thackeray on sanwad yatra shivsena uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच’

 

Pune Crime | सराईत गुन्हेगाराकडून 5 पिस्तूल व 14 काडतुसे जप्त, विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

 

BJP PM Candidate 2024 | नरेंद्र मोदीच असणार भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार, जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटले