शाहरुखची लेक क्रिकेटपटूबरोबर डेटिंगला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रेटीमध्ये असणारं नाते काही नव्याने सांगण्याची गरज नाही. एखादा खेळाडू आणि कलाविश्वात योगदान देणाºया कलाकारांचे जुळणारे सूत याच्या चर्चांना ग्लॅमर मिळत आले आहे़ अशा काही खेळाडू आणि स्टारचे पुढे पतीपत्नीच्या नात्यात रुपांतरही झाले आहे़ सध्या अशीच एक चर्चा पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बॉलिवूड किंंग शाहरुख खानची लेक सुहाना आणि युवा फलंदाज शुभमन गिल यांच्या नात्याची सध्या बरीच चर्चा रंगत आहे.
१९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघात चमकदार कामगिरी केल्यानंतर यावर्षी आयपीएलच्या ११ व्या सत्रात शाहरुख खान मालक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने शुभमन गिलला करारबद्ध केले होते. त्याने आपल्या खेळीने अनेकांची मने जिंकली आहेत. आयपीएलनंतर दोघांना एकत्र फिरताना पाहण्यात आल्याने शुभनम आणि सुहानाच्या अफेअर्सची चर्चा रंगली आहे याबाबत अधिकृत माहिती नसली तरी यासंदर्भात बातम्या झळकल्या आहेत.

शुभमन गिल भारताचा सर्वात प्रभावी उदयोनमुख खेळाडू मानला जातो. सुहानासोबत त्याचं नाव जोडले गेल्याने या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like