Shahid Kapoor | अभिनेता शाहिद कपूरचे झाले होते लहानपणी लैंगिक शोषण; कबीर सिंगच्या वादावर बोलताना दिली होती कबुली

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा त्याच्या चित्रपटांमुळे व वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. शाहिदच्या भूमिका या अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. त्याचा काही वर्षांपूर्वी आलेला चित्रपट कबीर सिंग (Kabir Singh Movie) व त्यातील शाहिदची एक्टिंग प्रेक्षकांना खूप आवडली होती. (Shahid Kapoor Movies) मात्र काहींनी त्याच्या या भूमिकेला चूकीची व शारिरीक शोषण दाखवणारी असल्याचा आरोप केला होता. प्रेमात असणारा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारची वागणूक व मारहाण करत नाही असे अनेकांचे म्हणणे होते. याबददल अनेक वाद विवाद झाल्यानंतर शाहिदने एका मुलाखती दरम्यान याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले होते. यावेळी त्याने त्याच्या सोबत लहानपणी झालेल्या (Shahid Kapoor Sexual Abuse) लैंगिक शोषणाची कबुली दिली होती.

मुलाखती दरम्यान शाहिद कपूरने त्याच्या सोबत लहानपणी झालेल्या लैंगिक छळाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला की, “मी माझ्या लहानपणी शारीरिक अत्याचार पाहिले आहेत. पण ही एक अतिशय साधी मुलगी आणि एक अतिशय हुशार, आक्रमक, अशांत मुलगा यांच्यातील प्रेमकथा होती आणि असे प्रकार रोज घडतात.”

अभिनेता शाहिद कपूरचा कबीर सिंग हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता व तेवढाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. एका मुलाखतीमध्ये चित्रपटातील नायकाच्या नेगेटीव्ह गोष्टींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे सांगितले होते. शाहिद म्हणाला की मी हीरो किंवा एंटी-हीरो या नजरेतून कबीर सिंग या भूमिकेकडे पाहत नाही. मी फक्त नायक म्हणून याच्याकडे पाहतो. प्रत्येक नायक हा चांगलाच असतो असे नाही. देवदास चित्रपटातील देवदास देखील पारोचे लैंगिक शोषण करतो पण तिथे तो नायक आहे. त्यावेळी शाहिदने हेही कबूल केले की देवदास (Devdas Movie) एक हीट व चांगला चित्रपट आहे.

शाहीद पुढे म्हणाला की, “माझा मुद्दा असा आहे की, आपण सर्वजण प्रेमात गडबडलो आहोत की नाही ? आपण सर्वजण परिपूर्ण आहोत का? प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी त्यांनी ही कितीही वाईट केले असेल तरीही. आणि कुठेही कबीर सिंग हा ग्रेट माणूस आहे असे म्हणालेले नाही तर प्रोमो मध्ये असेच सांगितले आहे की, तो अस्वस्थ आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याला चिडवत आहे. समाज स्वीकारत नाहीये.

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शाहिदच्या ‘विवाह’ (Vivah), ‘जब वी मेट’ (Jab We Met) व ‘पद्मावत’ (Padmaavat) चित्रपटातील भूमिका गाजल्या आहेत. त्याच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. त्यांची नुकतीच ‘ब्लडी डॅडी’ (Bloody Daddy) हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

Web Title :   Shahid Kapoor | shahid kapoor has been abused as a child amidst trolling of kabir singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध