#MeToo बाबत अभिनेते शक्ती कपूर यांची ऑडिओ क्लिप; थेट मोदींना आवाहन

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – # मी टू च्या वादळाने बॉलिवूडला चांगलेच हादरवून सोडले आहे. आता केवळ बॉलिवूडच नव्हे तर शैक्षणिक राजकीय ,सामाजिक कॉर्पोरेट क्षेत्रात देखील मी टू च्या वादळाने धुमाकूळ घातला आहे. #MeToo या मोहिमेबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f3c216d-d050-11e8-9682-858112a92820′]

बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘बॅड बॉय’ म्हणून परिचीत असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शक्ती कपूर यांच्यावर अद्याप कोणी आरोप केलेले नाहीत, मात्र त्यांनी या अभियानावर काही प्रश्न उपस्थित करत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे.

“अशा प्रकारणांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे आरोप केल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता, जोवर कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत बदनामी रोखावी, मग तो कोणी कलाकार, व्यावसायिक किंवा नेता असो, कोर्टात सिद्ध झाल्यानंतरच नाव जाहीर करावं”, असं आवाहन शक्ती कपूर यांनी केलं आहे.

#MeToo : ‘हा’ खानही शोषणाचा शिकार

[amazon_link asins=’B071JWBFDT,B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’199de7e5-d050-11e8-8747-dd470fa922eb’]

केवळ आरोप झाल्याने अनेकांचं आयुष्य बरबाद झालं आहे. त्यांचं संपूर्ण करिअरच संपतं. त्याला नोकरीवरुन हाकललं जातं. स्वत:ची बायका मुलंही त्याला संशयाने पाहू लागतात, असं शक्ती कपूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून, याबाबत कायदा करावा, असं आवाहन शक्ती कपूर यांनी 1.55 मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये केलं आहे.शक्ती कपूर यांनी स्वत:वर ओढवलेल्या परिस्थितीचाही दाखला दिला आहे.

त्यामुळे केवळ आरोप झाल्यानंतर तातडीने नाव जाहीर न करता, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर नाव जाहीर करावं, असं आवाहन शक्ती कपूर यांनी मोदींना केलं.

सध्या अनेकांवर आरोप होत आहेत. दिग्दर्शक साजिद खानला सिनेमातून वगळलं, हृतिक रोशनवर आरोप झाले, अमिताभ बच्चन यांचंही नाव आलं आहे, उद्या मोदीसाहेब तुमच्यावरही आरोप होतील, तर तुम्ही काय करणार? असा प्रश्न शक्ती कपूर यांनी विचारला आहे.

[amazon_link asins=’B073JZ9QGQ,B016EOZ7OO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2522d236-d050-11e8-bc76-57ff02bb07c9′]

शक्ती कपूर आणि पूनम पांडे यांच्या आगामी ‘जर्नी ऑफ कर्मा’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, शक्ती कपूर यांना तनुश्री दत्ता- नाना पाटेकर वादावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळ त्यांनी आपल्याला हे प्रकरण माहित नसल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यांना तनुश्रीने ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर 10 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेवरुन केलेल्या आरोपाची माहिती दिली, तेव्हा शक्ती कपूर म्हणाले, 10 वर्षांपूर्वी? मला काही माहित नाही. 10 वर्षांपूर्वी मी खूपच लहान मुलगा होता”

तरुणीला लिफ्ट देणे पडले महागात