रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे करणार बॉलिवूड ‘डेब्यू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रणवीर सिंग जवळपास 7 वर्षांपूर्वी यश राज बॅनरचा सिनेमा ‘बँड बाजा बाराती’मधून बॉलिवूडमध्ये आला होता. रणवीर आता त्याच्या आगामी सिनेमातून एका बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसला एन्ट्री देणार आहे. रणवीर सिंगचा आगामी सिनेमा ‘जयेश भाई जोरदार’ या सिनेमातून शालिनी पांडे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. शालिनी तेलगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ या सुपरहिट सिनेमात झळकली आहे. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसलेल्या शालिनीचा क्युटनेस सर्वांनाच आवडला होता.

यश राज बॅनरनं रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, भूमी पेडणेकर असे बॉलिवूड स्टार्स फिल्म इंडस्ट्रीला दिले आहेत. प्रोड्युसर मनीष शर्मानं शालिनीला या सिनेमासाठी निवडलं आहे. मनीष शर्मा म्हणतात, “आम्हाला या सिनेमासाठी नवीन चेहरा हवा होता. हीच स्क्रिप्टची मागणी होती. शालिनी या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. तिच्या ऑडिशनवरूनच हे लक्षात आलं होतं. ती या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात घर करेल यात शंका नाही.”

View this post on Instagram

A grateful heart🙏🏽

A post shared by Shalini (@shalzp) on

शालिनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर साऊथ सिनेमात काम करण्यापूर्वी ती ‘जबलपूरमध्ये थिएटर आर्टीस्ट’ होती. अर्जुन रेड्डीमधील तिच्या कामाबद्दल शालिनीचं खूप कौतुक झालं.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like