Shambhuraj Desai | ठाण्यातील घटनेवर पोलिसांना कृती आराखडा बनविण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आदेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात काल (दि. 14) सकाळी मद्याच्या नशेत असलेल्या एका रिक्षावाल्याने तरुणीवर बळजबरी केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी राज्य सरकारच्या (State Government) वतीने कृती आराखडा (Action Plan) तयार करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. यावेळी पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

 

घराबाहेर महिलांना आणि तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश पोलिसांना (Thane Police) देण्यात आले आहेत. तसेच रिक्षावाल्यांनी जर भाडे नाकारले, तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे देसाईंनी (Shambhuraj Desai) सांगितले. पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी बैठकीला पोलीस आयुक्त जयजित सिंह (Thane CP Jayjit Singh), सहआयुक्त दत्तात्रय कराळे (Joint CP Dattatraya Karale), अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेश जाधव (Addl CP (Administration) Suresh Jadhav), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे (Addl CP (Crime) Ashok Morale) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी देसाई म्हणाले, काल घडलेल्या घटनेची माहिती मिळताच मी तातडीने पोलीस आयुक्तांसोबत बोलून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
संबंधित तरुणीने तक्रार देताच तीन टीम बनवून आरोपीचा शोध घेतला गेला. आणि त्यानुसार चोवीस तासांत त्याला अटक (Arrest) केली गेली.
पुढील काळात असे प्रकार घडू नयेत, म्हणून पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली गेली.
अशा स्वरुपाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशात शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसच्या परिसरात साध्या
वेशातील महिला पोलिसांची नेमणूक करणे आणि बीट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना यावेळी पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Shambhuraj Desai | Guardian Minister Shambhuraj Desai’s order to prepare an action plan for the police on the incident in Thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा