Shambhuraj Desai | अजित पवारांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले – ’70 हजार कोटी खर्च करुनही…’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी केला होता. अजित पवारांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्या की पृथ्वीराज (Prithviraj Chavan) बाबा म्हणाले तसं होतं. 70 हजार कोटी खर्च करुन 1 टक्काही काम होत नाही, असा टोला शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अजित पवारांना लगावला. ते कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

70 हजार कोटी खर्च करुन एक टक्काही फायदा झाला नाही, असं काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. हा तोटा असतो घाई गडबडीत फाईल क्लिअर करण्याचा, अशा शब्दात शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. सुट्टीवर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 65 फाईल क्लिअर केल्या होत्या. यावर अजित पवार यांनी टीका केली होती. त्याला देसाई यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्या की 70 हजार कोटी खर्च करुन 1 टक्काही काम होत नाही.
त्यामुळे आम्ही चार चार वेळा बघून फाईल क्लिअर करतो. पब्लिक इंटरेस्ट असेल तरच गडबड करतो.
आम्हाला लोकांचे हित महत्त्वाचे आहे. राज्याच्या तिजोरीतील पैसा योग्य प्रमाणात खर्च झाला पाहिजे याची
खबरदारी आम्ही घेतो, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर

राज्यभर सुरु होणाऱ्या राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ सातारा जिल्ह्यातील
पाटण मरळीमधून होणार आहे. शनिवारी (दि.13) मे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या योजनेतून 25 हजार नागरिकांना
फायदा दिला जाणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.

Advt.

Web Title :-   Shambhuraj Desai | Maharashtra minister shambhuraj desai criticized ajit pawar over cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

Pune – G20 Summit | पुणे : जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न