Shambhuraj Desai | राष्ट्रवादी काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर, शंभूराज देसाईंचा विजय शिवतारे होईल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुढील 15 वर्ष सत्तेत येणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शेख म्हणाले, शंभुराज देसाई यांचा विजय शिवतारे (Vijay Shivatare) होईल. पुढील विधानसभेला पाटणची परिस्थिती शंभूराज (Shambhuraj Desai) यांना समजेल. राज्यातील खोके सरकार निष्क्रिय आहे, अशी टीका शेख यांनी केली.

मेहबूब शेख म्हणाले, सातार्‍यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून (Patan Assembly Constituency) पुढच्या वेळी शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) आमदार होणार नाहीत. त्यामुळे शंभुराज यांचा नाईलाज झाला आहे. मी किती प्रामाणिक आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पटवून देण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही. पण पाटणची परिस्थिती शंभुराज देसाईंना पुढच्या विधानसभेत कळेल. शंभुराज देसाईंचा देखील विजय शिवतारे होणार.

ज्या शिवतारेंचा उल्लेख मेहबुब शेख यांनी केला आहे ते विजय शिवतारे पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे (Purandar Assembly Constituency) माजी आमदार (Former MLA) आहेत.
शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून येत असत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन
शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. तत्पूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवतारेंना
राष्ट्रवादीने पराभवाचा धक्का दिला होता. अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवतारेंना आव्हान देत म्हटले होते की,
विजय शिवतारे, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते. यानंतर शिवतारेंचा पराभव झाला होता.

दरम्यान, शंभुराज देसाईंनी म्हटले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही.
जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस
(Congress) सत्तेतून बाजूला गेली की लोकशाही धोक्यात आली, असे रामराजे म्हणतात.
तर मला पण राजे साहेबांना सांगायचे आहे की, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे.
लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे. लोकशाही मार्गानेच सभापतींची निवड केली आहे.
आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत.

Web Title :- Shambhuraj Desai | ncp leader mehboob shaikh slams satara patan shivsena minister shambhuraj desai warns of vijay shivatare like situation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ठरविली

Energy Giving Foods | एनर्जीच्या पॉवरहाऊस आहेत ‘या’ 9 गोष्टी, हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर होत नाही सुस्त