Shanaya Kapoor | ठरलं तर मग! अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया करणार ‘या’ चित्रपटातून दमदार पदार्पण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये सध्या स्टार किड्सच्या (Bollywood Star Kids) लॉन्चिंगचा हंगाम सुरु आहे. शाहरुखच्या (SRK) मुलीपासून अमिताभ बच्चनच्या (Big B) नातूपर्यंत अनेक प्रसिद्ध स्टार किड्स मनोरंजनविश्वात पदार्पण करत आहेत.(Star Kids Bollywood Debut) यामध्ये आता आणखी एका स्टार किडची भर पडली आहे. संजय कपूर (Sanjay Kapoor) व महीप कपूर (Maheep Kapoor) यांची लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) आता मनोरंजन विश्वामध्ये दमदार एन्ट्री करणार आहे. शनायाच्या पदार्पणाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. दिग्दर्शक करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली लॉन्च करणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. आता ती साऊथमध्येही पदार्पण करत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही एका पॅन इंडिया चित्रपटातून पदार्पणास सज्ज आहे.

संजय कपूर यांची मुलगी (Sanjay Kapoor Daughter) शनाया कपूर हिचा पदार्पणापूर्वीच मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असून तिची मोठी फॅन फॉलोईंग आहे. शनाया आता मोहनलाल (Actor Mohanlal) यांच्या ‘वृषभ’ चित्रपटातून (Vrishabh Movie) साऊथमध्ये दमदार एन्ट्री करत आहे. बहुचर्चित या ‘वृषभ’ चित्रपटाची निर्माती एकता कपूर (Producer Ekta Kapoor) असून दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक नंद किशोर (Director Nand Kishore) सांभाळणार आहे. या चित्रपटातील कलाकारांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. आता शनाया कपूर (Shanaya Kapoor South Debut) देखील चित्रपटाचा भाग असणार असून शनाया चित्रपटात महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसणार आहे.

‘वृषभ’ चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल झळकणार असून यामध्ये शनाया देखील महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसणार आहे. या चित्रपटाची मेन कथा ही वडील आणि मुलाच्या नात्यावर फिरणार आहे. ही एक पीरियड फिल्म असून यामध्ये भूतकाळ आणि वर्तमान या दोन्ही गोष्टींचा समावेश असेल. यामध्ये प्रेम व बदला या गोष्टींवर लक्ष केद्रींत करण्यात आले आहे. या चित्रपटात शनाया कपूरची भूमिका अतिशय डायनॅमिक पद्धतीची असणार आहे. हा चित्रपट एक हाय ऑक्टेन अॅक्शन ड्रामा (High-Octane Action Drama) आहे. प्रामुख्याने चित्रिकरण हे तेलुगु आणि मल्याळममध्ये केले जाणार असून डबिंगनंतर सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा आहे. ‘वृषभ’ चित्रपटात शनाया कपूर (Shanaya Kapoor) कसा अभिनय करते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title :  Shanaya Kapoor | shanaya kapoor is part of vrushabha makes her south debut with mohanlal directed by nanda kishore

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून सराफी दुकान लुटण्याच्या तयारीतील तिघांना अटक, हत्यारे जप्त

NCP Chief Sharad Pawar | पक्ष फोडणाऱ्यांना किंमत मोजावी लागणार ! खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे निलंबित करत शरद पवारांचा इशारा

Bank fraud case: CBI registers FIR against Pune-based builder