Sharad Koli | मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम भाजपने लावलेला आहे – शरद कोळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडात सामील झालेले 50 पेक्षा जास्त आमदार यांनी प्रत्येकी 50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) करत आहे. त्यावर आता ठाकरे गटाच्या युवासेनेने शिंदे गटावर टीका केली आहे. युवासेनेचे शरद कोळी (Sharad Koli) यांनी शिंदे गटाला धोक्याचा इशारा दिला आहे. 50 खोके घेतलेल्या मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांचा भाजप (BJP) योग्य क्रार्यक्रम केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे शरद कोळी (Sharad Koli) म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचे नेते सातत्याने शिंदे गटावर 50 कोटी घेतल्याचा आरोप करत आहेत. त्यात भाजप आणि शिंदे समर्थक अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या वादाने भर घातली होती. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर 50 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भाजप शिंदे गटाची प्रतिमा डागाळली होती. त्यात आता युवासेनेने शिंदे गटाचा योग्य कार्यक्रम भाजप लावणार आहे, असा इशाराच दिला आहे.

यावेळी शरद कोळी (Sharad Koli) यांनी राणा दाम्पत्यावर देखील हल्ला चढविला.
राज्यात राणा कंपनीने तमाशाचा फड मांडला आहे. राणा पती-पत्नी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांते बाहुले आहेत.
ते जसे हलवतील तसे ते नाचतात. ही तमासगिरांची टोळी आहे. यांनी सर्वांनी 50 – 50 कोटी घेतले हे जनतेला
आणि यांना एकमेकांना माहीत आहे. हे प्रकरण बाहेर आले, तर अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
या आमदारांवर दिल्लीतून गेम झाला आहे. मुख्यमंत्री आणि इतर आमदारांना लवकरच भाजपची खेळी कळणार आहे.
या सर्व पन्नास आमदारांचा बिमोड लवकर होणार आहे. ही सर्व भाजपची मोठी खेळी होती, हे सर्वांना कळून चुकणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि 50 आमदारांचा योग्य कार्यक्रम केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही, असे शरद कोळी म्हणाले.

Web Title :- Sharad Koli | shivsena uddhav balasaheb thackeray yuva sena sharad koli criticised eknath shinde group and ravi rana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना सोमय्यांचे चॅलेंज, म्हणाले – ‘संजय अंधारीला…’

Diabetes Reverse | दीर्घकाळ मधुमेहाने पीडित आहात का? कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 6 वनस्पतींचा आहारात करा समावेश

Sushma Andhare | शिंदे गटातील आमदाराचा सुषमा अंधारे टोला, म्हणाले -‘…अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या’