कारखान्याबद्दल असणारे सर्व प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात; ‘या’ आमदाराचे विधान

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा येथील आर्थिक अडचणीत सापडलेल्या किसन वीर सहकारी कारखान्यासाठी आता शरद पवार यांनी धाव घेतली आहे. तर याबाबत पवार यांनी बैठक घेतल्या असून या बैठकीमध्ये कारखान्याला अडचणीतून दूर करण्यासाठीचा पर्याय कोणता असावा यावर चर्चा झाल्याचे कळते. कारखान्याच्या असणाऱ्या सध्याच्या स्थिती संदर्भात शरद पवार यांनी लक्ष वेधले आहे.

यावरून, आमदार मकरंद पाटील यांनी म्हटले आहे कि, वाई तालुक्यात १० लाख टन ऊस या कारखान्यावर अवलंबून असून आतपर्यंत आम्ही कारखान्यात लक्ष घातले नाही. कारण त्याचा आमच्या राजकारणाला तोटा होईल. हे कारण घेऊन कुठं असं सांभाळायचं ? हा कारखाना सहकारात नावाजलेला आहे. किसन वीरांचं नाव त्याच्याशी जोडलं गेलं आहे. आता जर कारखाना मोडून पडला तर, आम्ही लक्ष घातलं नाही म्हणून तो मोडून पडला असं मानलं जाईल. असे त्यांनी म्हटले. तर उद्या निवडणुकीच्या माध्यमातून कारखाना ताब्यात घेतलाच तर सर्व देणेकरी माझ्या दारात उभे राहणार आहेत. आणि त्यांची देणी वेळेत नाही देता आली, तर आमचे राजकारण संपेल असे ते म्हणाले, तर दुसऱ्याच कोणी तरी निर्माण केलेल्या अडचणीमुळे कोंडी मात्र, माझी होतेय, असं आपलं दुखणं त्यांनी चर्चे दरम्यान केले आहे. तसेच हे असणारे सर्व प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात असेही त्यांनी त्यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, कारखान्याच्या सद्यस्थिती बाबत शरद पवार यांच्या उपस्थित चर्चा करण्यात आल्याने, बैठकीमध्ये कारखान्याला संकटातून बाहेर आणण्यासाठी सुमारे १ हजार कोटींची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. तर त्यामध्ये किरकोळ देणी, शेतकऱ्यांचे बिले, वाहनांची कर्जे, हमी, बँकांची देणी, या सर्व गोष्टी विचारात घेऊन आता कारखान्यावर असलेल्या खंडाळा आणि प्रतापगड कारखान्याचे ओझे कमी करता आल्यास तसेच सध्याच्या साखरनिर्मितीच्या किंमत ग्राह्य धरल्या तरीही ६०० कोटी रुपयांची गरज असणार आहे. त्यामुळे हे ६०० कोटी रुपये कसे उभे करायचे यावरही बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. तर आताची सर्व कर्जे एकत्र करून एखाद्या लीड बँकेकडे जाऊन ६ वर्षाच्या अधिक मुदतीचे कर्ज घेऊन तो काही कालावधीने ते कर्ज फेडता येऊ शकेल यावरही चर्चा झाली आहे. तसेच कारखान्याबाबत तक्रारीवरून चौकशीचे पवार यांनी मंत्र्यांना प्रश्न केल्यावर त्यावरून सक्षम अधिकाऱ्याची निवड करून चौकशी लावतो असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.