पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar News | बिहारमध्ये जातनिहाय जनगणना जाहीर केल्यानंतर आता विविध राज्यांतून जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, याबाबतची मागणी जोर धरु लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघाकडून शरद पवार यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. त्यावेळी शरद पवार बोलत होते. (Sharad Pawar News)
शरद पवार म्हणाले, कोणता समाज किती टक्के आहे? याबाबतची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे, त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Sharad Pawar News)
पाणी, जंगल, जमीनी याचे आदिवासी मालक
आदिवासींना वनवासी म्हटले जाते. आदिवासी या देशातील संस्कृतीचा घटक आहे. प्राणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे. त्यांना तुम्ही या मार्गाने जा, पूजा अर्चा करा अशा प्रकारची भूमिका सांगितली जाते. ही भूमिका मान्य नसल्याचे आदिवासी तरुणांनी शिवनेरीच्या पायथ्याशी माझ्यापुढे मांडली, असे शरद पवार यांनी सांगितले.
भटक्या विमुक्तांचे अनेक प्रश्न
शरद पवार पुढे म्हणाले, भटक्या विमुक्तांचे अनेक प्रश्न असून आजचे राज्यकर्ते या प्रश्नांबाबत किती जाणकार,
जागरुक आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्याची भावना त्यांच्या अंतकरणामध्ये कितपत आहे.
याबाबत शंका व्यक्त करावी अशी स्थिती आहे. राज्यकर्त्यांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे.
एकेकाळी सोलापूर, बारामतीत भटक्या समाजातील घटकांना गुन्हेगार ठरवून त्यांना तारांच्या कुंपणात ठेवले जात होते.
स्वातंत्र्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरमध्ये जाऊन कुंपणाच्या तारा तोडल्या. तुम्ही आजपासून विमुक्त आहात.
गुन्हेगार नाहीत असे सांगितले. आमच्याकडे सत्ता असताना जाणीवपूर्वक सवलती दिल्या.
आजही फार मोठा वर्ग एका वेगळ्या स्थितीत राहत आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
परंतु, त्यासाठी राज्यकर्त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे शरद पवार म्हणाले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update