Sharad Pawar On Ajit Pawar | शरद पवारांची अजितदादांवर खरमरीत टीका, म्हणाले बालबुद्धीतून ते बोलत असतात, त्याकडे आपण का लक्ष द्यायचे?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On Ajit Pawar | शरद पवार कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करणारी वक्तव्य करतात. मी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अडीच वर्ष जवळून पाहिले आहे. ते आपला पक्ष विलीन करतील असे मला अजिबात वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. यावर आता ज्येष्ठ नेत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवारांचे वक्तव्य बालबुद्धीचे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, यावर मी फार काही बोलू इच्छित नाही. मात्र राजकारणात बालबुद्धी असे वैशिष्ट्य असणारे अनेक लोक असतात. अशा बालबुद्धीतून ते बोलत असतात. त्याकडे आपण का लक्ष द्यायचे? असा खोचक सवाल पवार यांनी केला.(Sharad Pawar On Ajit Pawar)

काय म्हणाले होते अजित पवार…

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार सारखेच आहेत, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, शरद पवार कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करणारी वक्तव्य करतात. मी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष जवळून पाहिले आहे. ते आपला पक्ष विलीन करतील असे मला अजिबात वाटत नाही.

अजित पवार पुढे म्हणाले होते, शरद पवार यांना जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते इतरांना त्या निर्णयात
ओढून घेतात. आपण सर्वसमंतीने सामूहिक निर्णय घेत आहोत, असे चित्र ते निर्माण करतात.
पण शरद पवारांना पाहिजे तेच करतात. फक्त सर्वांना घेऊन चर्चा केल्याचे ते दाखवितात.

अजित पवार यांच्या याच वक्तव्यावरून आज शरद पवार यांनी पहिल्यांदाच खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना 25 लाखांचा गंडा

Maval Lok Sabha | मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांचेकडून आढावा

Ravindra Dhangekar | विविध संस्था-संघटनांचा रवींद्र धंगेकरांना पाठिंबा