Sharad Pawar On BJP Manifesto | जाहीरमान्यावरून शरद पवारांचा भाजपाला टोला, ”आश्वासनांची पूर्तता न करणे हे त्यांचे वैशिष्ट्य”

अकलूज : Sharad Pawar On BJP Manifesto | भाजपने जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत, त्यावर आता भाष्य करणे योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणे आणि त्याची अंमलबजावणी न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ईडी (ED), सीबीआय (CBI) या यंत्रणांचा गैरवापर करणे हे मोदींचे सूत्र आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये केली.

आज भाजपाने आपला जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. संकल्प पत्र असे नाव या जाहीरनाम्याला देण्यात आले आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. (Sharad Pawar On BJP Manifesto)

शरद पवार म्हणाले, मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ देऊ नका असे ते म्हणतात. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जसा तसाच विरोधी पक्षही महत्वाचा असतो. एकही माणूस निवडून येऊ देऊ नका ही भूमिका घेणे याचा अर्थ रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र यात काही फरक नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत.

शरद पवार म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती.
आज सायंकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येथे येतील आणि पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होईल.

पवार पुढे म्हणाले, लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख १६ एप्रिल आहे.
सोलापुरात दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील.
याचबरोबर शिवसेनेचे करमाळ्यचे माजी आमदार नारायण आबा पाटील (Narayan Aba Patil)
येत्या २६ एप्रिल रोजी पक्षात प्रवेश करणार आहेत, असे पवार यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त