Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही’ – शरद पवार

बारामती : Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule | काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकारांविषयी केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बावनकुळेंचा समाचार घेतला आहे. पत्रकरांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही, असे म्हणत पवारांनी कठोर शब्दात सुनावले आहे. (Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule)

शरद पवार त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळेंचा समाचार घेताना पवार म्हणाले, महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नाही. पत्रकारांनी महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा केली नव्हती. चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखे पत्रकारांचे महाराष्ट्रात चित्र नाही. (Sharad Pawar On Chandrashekhar Bawankule)

मराठा आंदोलनावर भाष्य करताना पवार म्हणाले, मराठा समाज त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण करत आहे. राज्य सरकारने त्यांना शब्द दिलाय की आम्ही प्रश्न सोडवू. ओबीसींना वाटते की त्यांच्यातील आरक्षण इतर कोणी घेऊ नये, याचीही नोंद राज्य सरकारला घ्यावी लागेल. याबाबतही काही निर्णय घेऊ, असा विश्वास केंद्र सरकारने दिला आहे.

पवार म्हणाले, मराठा समाजाला जी आश्वासने दिलीत, त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेते हे ३०-३५ दिवसांत कळेल.
त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा काय होईल हे आज सांगता येणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो २ कंपनीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने
मध्यरात्री २ वाजता नोटीस बजावून ७२ तासात कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते.
ही कारवाई राजकीय द्वेशातून करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी केला होता.
याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. मी त्यावर उत्तर देऊ इच्छित नाही, असे ते म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Sujata Phadnis Passes Away | दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांना मातृशोक, सुजाता फडणीस यांचे निधन