Sharad Pawar On Modi Govt | मोदी सरकारवर पवारांचा पुन्हा हल्लाबोल, भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा करून भ्रष्टाचाऱ्यांनाच जवळ घेत…

इंदापूर : Sharad Pawar On Modi Govt | ज्येष्ठ नेते शरद पवार हे मागील काही दिवसांपासून महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी यावरूनच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचार संपवण्याची घोषणा करुन, भ्रष्टाचाऱ्यांनाच जवळ घेत, स्वच्छ करणारे मोदी सरकार हे भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचे क्लिनिंग मशीन झाले आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे. ते इंदापुर येथे बोलत होते. (Indapur Sabha)

इंदापुरमधील नेते आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, कांतीलाल झगडे, विलास माने, भाजपचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, प्रतापराव पालवे व शेकडो समर्थकांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात पवार बोलत होते. वाघ पॅलेस येथे झालेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती. (Baramati Lok Sabha)

शरद पवार म्हणाले, २०१४ मध्ये इंधन दरवाढ रोखण्याचे, २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे, घरगुती गॅसची किंमत कमी करण्याचे आश्वासन मोदी सरकारने पाळले नाही. शंभरातल्या बेकार तरुणांपैकी ८७ तरुणांना आज देखील नोकरी नाही.(Sharad Pawar On Modi Govt)

शरद पवार पुढे म्हणाले, काळा पैसा संपवून गरिबांच्या खिशात १५ लाख रुपये जमा करणार असे ते म्हणाले. १५ लाख सोडा, १५ रुपयेसुद्धा गरीबांच्या खिशात पडलेले नाहीत. २०१६ मध्ये नोटबंदी केली. पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्या. पण काळा पैसा संपला नाही.

एका बाजूला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूला खतांचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे,
विजेचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूला ती रक्कम काढून घ्यायची, असा प्रकार सुरू आहे, अशी टीका पवारांनी केली.

पवार म्हणाले, पुन्हा मोदींच्या हातात देशाची सत्ता द्यायची नाही, हे लोकांनी ठरवले आहे.
ज्या कुटुंबांनी स्वातंत्र्याआधी व नंतर देशाची सेवा केली केली त्यांच्याकडे देशाची सत्ता द्यायची की, माणसांमध्ये,
जातींमध्ये, धर्मांमध्ये, भाषांमध्ये दुरावा वाढवण्यासाठी सत्तेचा वापर करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्यायची,
याचा निर्णय यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घ्यायचा आहे.

शरद पवार म्हणाले, आतापर्यंत मतभेद नको म्हणून आम्ही लक्ष देत नव्हतो.
बारामती असेल, महाराष्ट्राची अनेक मोठी गावे असतील तिथे अनेक कार्यक्रम, धोरणे राबवली. संस्था उभ्या केल्या.
हाच दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा आहे, असे पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार