Sharad Pawar On Udayanraje Bhosale | शरद पवारांनी उदयनराजे स्टाईलने उडवली कॉलर, राजेंबाबत म्हणाले… (Video)

सातारा : Sharad Pawar On Udayanraje Bhosale | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar NCP) हे आज सातारा दौऱ्यावर (Satara Lok Sabha Election 2024) आहेत. आज त्यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांनी भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छूक असलेले उदयनराजे भोसले यांच्याबाबत प्रश्न विचारला असता पवार यांनी कॉलर उडवली, यावेळी एकच हशा पिकला. सध्या, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भाजपाने अजूनही उदयनराजे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. उदयनराजेंनी तुमच्याशी काही संपर्क केला होता का?, असे विचारले असता प्रश्न शरद पवार यांनी नाही असे उत्तर देत कॉलर उडवून दाखवली.(Sharad Pawar On Udayanraje Bhosale)

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. लोकसभेत श्रीनिवास पाटील यांनी चांगले काम केले. पुन्हा एकदा त्यांनी निवडणुकीत उभे रहावे अशी आमची मागणी होती. पण, त्यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

शरद पवार म्हणाले, जरी उमेदवारी घेतली नाही, तरी मी पक्ष देईल ती जबाबदारी पूर्ण करेन, असे श्रीनिवास पाटील
म्हणाले आहेत. सातारा जिल्हा आम्हाला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे.
साताऱ्यात उमेदवार देताना विशेष काळजी घ्यावी लागेल.

दरम्यान, साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू आहे. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील,
सुनिल माने, सत्यजित पाटणकर ही नावे कार्यकत्र्यांनी बैठकीत शरद पवार यांना सूचवली आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास