शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले 1111 पत्रे पाठवली

वाघोली : वाघोली येथे हवेली तालुका भाजपाच्या वतीने राष्ट्रवादीचे सर्वात सर्वे जेष्ठ नेते शरद पवार यांना 1111 जय श्रीराम लिहिलेली पत्र पोस्टाने त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली आहे.

श्रीराम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही असे शरद पवार यांनी काढलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वाघोली येथील पोस्ट ऑफिस मधून ही पत्रे भाजपच्या वतीने पाठवण्यात आली.शरद पवार यांना हिंदुस्थानातील हिंदूंचे ह्रदयात स्थान असलेले प्रभू श्रीरामाच्या नावाची आठवण करून देण्यासाठी जय श्रीराम लिहिलेली पञे एक हजार एकशे आकरा पत्रे पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने शरद पवार निवास्थान सिल्व्हर ओक मुंबई या त्यांच्या निवास स्थानी पाठवण्यात आली.यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास उंद्रे, संदिप सातव,दादासाहेब सातव,गणेश कुटे,
,सागर गोरे,गणेश सातव,दिनेश झांबरे,ज्ञानेश्वर गुंड सह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित.