Sharad Pawar | शरद पवारांकडून ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण ! महासंघाने निमंत्रण नाकारत केला गंभीर आरोप, म्हणाले – ‘राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी (Anti-Brahmin) असल्याची टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar)  यांनी राज्यातील ब्राह्मण संघटनांना (Brahmin organizations) चर्चेचे निमंत्रण (Called Meeting) दिले आहे. गेल्या 40 वर्षात पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. मात्र, या बैठकीला ब्राह्मण महासंघाचा (Brahmin Mahasabha) कोणताही पदाधिकारी जाणार नाही असं सांगत ब्रह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (President Anand Dave) यांनी हे निमंत्रण नाकारलं आहे.

 

शरद पवार (Sharad Pawar) यांनी चर्चेला बोलावलं आहे. परंतु सार्वजनिक व्यासपीठावर त्यांना भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असे वाटत असल्याने चर्चेचे निमंत्रण नाकारल्याचे दवे यांनी सांगितले. प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांच्या माध्यमातून ही मीटिंग होत आहे. ते सर्व ब्राह्मण संस्थांसोबत संपर्क ठेवून असतात. त्यांच्या मध्यस्थिने हे निरोप आले आहेत. तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीचे कारण साहेबांना सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे.

 

भेट नाकराण्याचे ही आहेत कारणं
शरद पवार यांची भेट न घेण्यामागे काही कारणे आहेत. परवाच्या प्रकरणानंतर त्यांनी आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांना शब्द माघारी घ्यायला सांगायचे होते. पण उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि ज्योतिष (Astrology) यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली. आरक्षणाचं (Reservation) चुकीचे उदाहरण दिलं.

तर शरद पवार मोठे झाले असते
केतकी चितळे (Ketki Chitale) पूर्णत: चुकल्याच आपण त्यांच्यावर टीका केली. पण पवार साहेबांनी केतकी यांना माफ करुन जर गुन्हे मागे घेण्यास सांगितले असतं तर ते खूप मोठे झाले असते, असे दवे म्हणाले. केतकी यांच्यावर 28 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मात्र, पोलिसांनी मिटकरी यांच्यावर एकही गुन्हा (FIR) दाखल केला नाही. आपल्या आंदोलनानंतर राज्यभर समाज जागा झाला. दिवंगत माणसावर शक्यतो कोणीच टीका करत नाही. मात्र, बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर टीका केली.

 

शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी
शरद पवार यांनी अगोदर मिटकरी आणि भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट करावी.
आमचा पवार साहेबांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही. त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज त्यांच्यावर नाराज असल्याचे फारसे ऐकायला मिळत नाही.
परंतु राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा (Brahmin Community) वापर करतात हे निश्चत, असा आरोप आनंद दवे यांनी केला.

 

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar called for a meeting but the brahmin mahasabha refused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parbhani Crime | अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त

 

LIC Share Price | LIC च्या शेअरमध्ये 13% घसरण ! आता काय करावे गुंतवणुकदारांनी…होल्ड करावे की विकून बाहेर पडणे चांगले?

 

MNS on Thackeray Government | मनसेचा ठाकरे सरकारला जोरदार इशारा; म्हणाले – ‘आज तुमचे दिवस…उद्या आमचे येतील’