Parbhani Crime | अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani Crime | परभणी जिल्ह्यातील विविध नदीपात्रातून अवैध उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर (Sand Mafia) पोलिसांनी कारवाई सुरु केल्याने सर्वसामान्यंमधून समाधान व्यक्त होत आहे. परभणी जिल्ह्यातील (Parbhani Crime) पाथरी तालुक्यातील (Pathri Taluka) डाकू पिंपरी येथील नदीपात्रून होणाऱ्या अवैध उत्खनन (Illegal Excavation) व चोरट्या वाहतुकीवर (Smuggling) पोलिसांनी कारवाई करुन 1 कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी लोढा (Gangakhed Sub-Divisional Police Officer Lodha) यांनी अवैध माफियांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. लोढा यांनी पाथरी पोलिसांशी (Pathri Police) संपर्क साधून नदीपात्रात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली. पोलीस अधीक्षक जयंत मीना (SP Jayant Meena) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 1 कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Parbhani Crime)

या कारवाईत आरोपी केशव मुंडे (Keshav Munde) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी 19 मे रोजी पाथरी न्यायालयात (Pathari Court) हजर केले असता पाथरी न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईने तहसीलच्या नाकावर टिच्चून होत असलेल्या अवैध उत्खनन व चोरट्या वाहतुकीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुरेश वाघ (Police Naik Suresh Wagh) यांनी फिर्याद दिली असून विविध कलमान्वये आरोपींविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात (Pathri Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Parbhani Crime | Action taken against illegal sand miners and transporters, 1.30 crore items seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Excessive Sweating In Air Condition | एअर कंडिशन असूनही घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

 

7th Pay Commission Pensioners | सरकारने जारी केला अलर्ट, 25 मेपर्यंत उरकून घ्या हे काम; अन्यथा रखडू शकते पेन्शन

 

Pune Crime | सामाजिक सुरक्षा विभागाकडून बिबवेवाडीत गावठी दारुच्या अड्ड्यावर छापा, महिलेसह 3 जणांवर FIR