MNS on Thackeray Government | मनसेचा ठाकरे सरकारला जोरदार इशारा; म्हणाले – ‘आज तुमचे दिवस…उद्या आमचे येतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS on Thackeray Government | मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांना मुंबई सत्र न्यायालयाचा (Mumbai Sessions Court) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन (Pre -Arrest Bail) मंजूर केल्यानंतर सोळा दिवसांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘आम्ही सरकारविरोधात बोलू नये, आमचं तोंड बंद राहावं, यासाठी सरकारने हा प्रयत्न केला. आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील,’ असा इशारा संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) दिला आहे.

 

माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, ”प्रसारमाध्यमांचं जे फुटेज होतं ते स्वयंस्पष्ट होतं, आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते.
तुमच्या फुटेजचे स्क्रीनशॉट माझ्या वकिलांनी कोर्टात दाखवले आणि सरकारने दबाव निर्माण करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचं सांगितलं.
आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- MNS on Thackeray Government | mns leader sandeep deshpande warns thackeray government after getting pre arrest bail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा