Sharad Pawar Sister Saroj Patil On NCP Split | ‘निवडणुका संपल्या की सगळे…’, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांच्या वक्तव्याने तर्क-वितर्कांना उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar Sister Saroj Patil On NCP Split | अजित (Ajit Pawar) काय बोलला, श्रीनिवास (Shriniwas Pawar) काही बोलले तर ते राजकारणापुरते आहे. निवडणुका संपल्या की सगळे ढग निघून जातील, असे वक्तव्य शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी केले आहे. या विधानावरून आता विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर रोजच्या रोज आरोप-प्रत्यारोप, टीका सुरू आहे. हा वाद न्यायालयापर्यंत पोहचला असून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तो आणखी वाढला आहे.

मात्र, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भगिनी आणि प्रा. एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी आज केलेले वक्तव्य पाहता, शरद पवार आणि अजित पवार हे दोघे निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येतील असा विश्वास त्यांना वाटत असल्याचे दिसून येत आहे.

सरोज पाटील म्हणाल्या, लोकांनी चिंता करू नये. उगीच गट फुटला, पवार कुटुंबात फूट पडली अशी चर्चा करू नका. काही होत नाही. निवडणुका होतील. जे निवडून यायचे आहेत ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून घरात येतो. एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन अत्यंत वेगळ्या डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. पण कधीही आमच्या घरात राजकारण आले नाही.

सरोज पाटील म्हणाल्या, जेव्हा एनडी पाटील निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा माझ्या आईने त्यांना १० हजार रुपये दिले होते.
पण आम्ही कधीच राजकारण घरात आणत नाही. शरद पवारांचे मी पाहिले आहे. स्वत:च्या ताटापेक्षा बहिणींच्या
ताटात सर्वकाही आहे का हे पाहतात. असे सुसंस्कृत कुटुंब असताना तिथे काहीही होणार नाही. मला तसे अजिबात वाटत नाही.

अजित पवारांनी शरद पवारांवर पातळी सोडून टीका केली. याबाबत सरोज पाटील म्हणाल्या, राजकीय पातळी सोडल्याचे
दु:ख वाटत आहे. पण आमच्या आईने आम्हाला शिकवले आहे की रडत बसायचे नाही. कसा तोल सुटतो हे मला कळत नाही.

पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली, ते बोलता बोलता आले असेल. कारण तो संवेदनशील आहे.
आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला कदाचित पश्चात्ताप झाला असेल.
पण या सगळ्याचे दु:ख नक्कीच झाले, असेही सरोज पाटील म्हणाल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Warje Malwadi Police | वारजे माळवाडी पोलिसांकडून मोक्क्यातील दोन फरार आरोपींना अटक

Earthquake In Marathwada | हिंगोली, परभणी व नांदेडमध्ये भूकंप, रिश्टर स्केलवर 4.5 ची नोंद