Sharad Pawar Vs Ajit Pawar | अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली, कोर्टाच्या निदेशानुसार आता प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये करावा लागेल ‘हा’ उल्लेख

नवी दिल्ली : Sharad Pawar Vs Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha) विजय शिवतारे (Vijay Shivtare), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच सर्व पवार कुटुंबियांनी देखील त्यांची साथ सोडल्याचे दिसत आहे. आता अजित पवारांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. कारण, अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये नोटीस जारी करून त्यामध्ये सर्व प्रचाराच्या जाहीरातींमध्ये पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.(Sharad Pawar Vs Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा (NCP) आणि पक्षचिन्ह कोणाचे याबाबतचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. या निर्णयानुसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ठरवण्यात आले, तर पक्षनाव आणि पक्षचिन्हही दिले. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे पक्षनाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले.

या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. याबाबतची माहिती लाईव्ह लॉ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

यामध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी
तुतारी वाजवणारा माणूस आणि पक्षाचे नाव राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार हे चिन्ह राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने,
महाराष्ट्र आणि इतर राज्यांत पोस्टरमध्ये शरद पवारांचे नाव वापरणार नाही, असे हमीपत्र द्यावे.

तसेच निवडणूक आयोगाला आदेश देताना न्यायालयाने म्हटले की, शरद पवार गटाला दिलेले नाव आणि चिन्ह निवडणूक
आयोगाने राखीव ठेवावे. हे नाव कोणत्याही पक्षाला वा व्यक्तीला देता येणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Khadki Crime | अनैतिक संबंधातुन खडकी परिसरात तरुणाचा खून, आरोपीला 24 तासात अटक

Pradeep Sharma | लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा

Pimpri Dighi Crime | पिंपरी : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Kothrud Crime | ज्यूस विक्रेत्याला मारहाण, एकाला अटक, कोथरुड परिसरातील घटना