Sharad Ponkshe | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शरद पोंक्षेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : Sharad Ponkshe | आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आज अनेक मंडळी त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. त्यातच अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेली पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. ते भारतीय स्वतंत्र लढ्यातील आघाडीचे नेते होते. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शरद पोंक्षेनी (Sharad Ponkshe) शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

मराठी नाटक, सिनेमा आणि मालिका मधून आपल्या अभिनयाचे ठसे अभिनेते शरद पक्ष यांनी चाहत्यांच्या मनावर उमटवले आहेत. ते नेहमीच चर्चेत असतात, समाजात घडणाऱ्या गोष्टींवर ते निर्भीडपणे वक्तव्य करत असतात. शरद पोंक्षेना कट्टर सावरकरवादी म्हणून देखील ओळखले जाते. नुकतीच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी एक जुन्या वृत्तपत्राचा फोटो शेअर केला आणि या
वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे स्वर्गारोहण असा मजकूर दिसत आहे आणि
त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा एक फोटो ही शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शन मध्ये म्हटले की
“आज विश्वरत्न स्वर्गवासी सावरकरांची पुण्यतिथी. स्वतंत्र भारतात जिवंत समाधी घेणारे शेवटचे युगपुरुष.
विनम्र अभिवादन.” सध्या शरद पोंक्षेनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.
तर अनेकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन देखील केले आहे.
कोटी कोटी प्रणाम, ‘विश्वरत्न सावरकर’, ‘विनम्र अभिवादन’ अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

Web Title :- Sharad Ponkshe | marathi actor sharad ponkshe share social media post about veer savarkar death anniversary