Sharad Ponkshe | शरद पोंक्षेंची संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह टीका

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – क्रांतीवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार अभिनेते शदर पोंक्षे (Sharad Ponkshe) यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी संभाजी ब्रिगेडवर (Sambhaji Brigade) आक्षेपार्ह टीका केली आहे.

 

स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे लोक शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेतात. मग हीच शिकवण तुम्हाला त्यांनी दिली का, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपटाचे प्रयोग बंद पाडणाऱ्यांचा समाचार घेतला. संभाजी ब्रिगेडवर टीका करताना पोंक्षे यांची जीभ घसरली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही सावरकरांचे विचार सर्वदूर पसरवत आहोत. त्यामुळे तुम्ही सावरकरांना बदनाम करण्याचे काम करा, आम्ही सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतो, असे देखील पोंक्षे यावेळी म्हणाले.

 

तसेच सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) संमती देऊनही हर हर महादेव चित्रपटाला विरोध का केला जात आहे,
असे शरद पोंक्षे म्हणाले. तसेच यासंदर्भात आपण संभाजी महाराजांची भेट देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटाला सेन्सॉर बोर्डोने परवानगी दिली आहे. तिथे हुशार माणसे नेमली आहेत. कोणता प्रसंग इतिहासातील कोणत्या प्रसंगावर आधारीत आहे, याचे पुरावे दिग्दर्शकाने दिले आहेत. प्रेक्षकांना मारुन चित्रपटगृहाच्या बाहेर काढले जात असल्याने हा हलकटपणा आहे, असे पोंक्षे म्हणाले. तसेच विरोध करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसे ते चित्रपट बनविणाऱ्याला नाही का? तुम्ही काय गुंड आहात का? आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेता, शाहू, फुले, आंबेडकर यांनी हेच शिकवले आहे का?, असा संताप पोंक्षे यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Sharad Ponkshe | Sharad Ponksen’s offensive criticism of the Sambhaji Brigade

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू