काँग्रेसतर्फे शरद रणपिसे आणि मिर्झा आतार यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेसाठी उमेदवार रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली. त्यांच्या उमेदवारीबद्दल पुण्यात उत्सुकता होती. काँग्रेसने आज शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा यांची नावे जाहिर केली.

शरद रणपिसे हे १९८० पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये पदाधिकारी असून सध्या ते विधानपरिषद काँग्रेसचे गटनेते आहेत. काँग्रेस पक्षाने उमेदवारी देताना माणिकराव ठाकरे आणि संजय दत्त यांना वगळले आहे. ठाकरे यांचा कार्यकर्त्यांमध्ये संपर्क मोठा असल्याने त्यांना डावलल्याची प्रतिक्रिया पक्षात तीव्रपणे उमटली आहे.[amazon_link asins=’B01N7Z39NR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3908b61b-7ee6-11e8-8f3f-57f023f944d3′]

एकूण ११ विधानपरिषद आमदार यावेळी निवृत्त होणार असून त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकपच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.

दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवास्थानी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत चर्चा करुन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम हे नेते उपस्थित होते.