शेअर बाजार ‘गडगडला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुपारी 3 च्या सुमारास सेन्सेक्समध्ये जवळपास 800 अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे सेन्सेक्स 35,500 वर पोहचला. निफ्टीने देखील घसरण दर्शवत 24.40 अंकांनी खाली आहे. देशात अर्थव्यवस्थेवर असलेल्या मंदीच्या सावटाचा आणि जीडीपी 5 टक्क्यांवर गडगडल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

सकाळी 10.22 वाजता सेन्सेक्स 413.58 अंकांनी घसरला होता. निफ्टी देखील 129.30 अंकावर आला होता. वाहन निर्मिती क्षेत्रात स्थिरता आल्याने गुंतवणूकीवर आणि खर्चावर परिणाम झाला आहे. देशाचा जीडीपी देखील सहा वर्षांच्या निच्चांकीवर आहे. वाहन निर्मिती क्षेत्रात निर्मिती थांबवण्यात आल्याने शेअर बाजारावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री 58 टक्क्यांनी घटली आहे. इतर वाहनांच्या विक्रीत आणि उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत.

मंदी सदृश्य परिस्थिती असल्याने देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणूकीचा ओघ कमी झाला आहे. गुंतवणूकदार कोणतेही जोखीम घेण्यास तयार नाही. देशातील अंतर्गत गुंतवणूक देखील कमी झाली आहे. जीडीपी कमी झाल्याने परदेशी गुंतवणूकीवर मोठा परिणाम दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like