Share Market | रु. ११८ चा शेयर रु. ३.३० पर्यंत घसरून पुन्हा सावरला, मागील ६ महिन्यात २९ टक्केपेक्षा जास्त दिला रिटर्न

नवी दिल्ली : Share Market | एकेकाळी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना (Stock Market Investors) मालामाल करणारा व्होडाफोन आयडियाचा शेअर (Vodafone Idea Share Price) अनेकांना कंगाल केल्यानंतर आता वाढू लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत २९ टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. एकेकाळी हा शेअर रु.११८ पेक्षा जास्त किमतीला विकला जात होता आणि एक वेळ अशी होती की तो रु. ३.३० पर्यंत खाली आला होता. (Share Market)

वोडाफोन आयडिया (तेव्हा आयडिया) चा शेअर १० एप्रिल २०१५ रोजी रु. ११८.४१ च्या भावावरून असा घसरला की, घसरत-घसरत ६ मार्च २०२० रोजी रु. ३.३० वर आला.

आता बाजार कमजोर असूनही, व्होडाफोन आयडियाचा शेअर काल एनएसईवर (NSE) सुमारे ८.८१ टक्क्यांनी वाढून बंद झाला. गेल्या ५ दिवसांत त्यात १३ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली दूरसंचार सेवा कंपनी व्होडाफोन आयडियाचा शेअर शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये (Intraday Trade) एनएसईवर जवळपास १० टक्क्यांनी वाढून ८.८५ रुपयांवर पोहोचला. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सव्र्हिसेसचे यावर ‘न्यूट्रल’ रेटिंग आहे आणि स्टॉकवर त्यांचे लक्ष्य ७.५ रुपये आहे.

कंपनीवर २,४०० कोटी रुपयांचे कर्ज
रिपोर्टनुसार, कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया सप्टेंबरपर्यंत सरकारकडे सुमारे २,४०० कोटी रुपयांची थकबाकी भरण्याची योजना आखत आहे. कंपनीने २०२२-२३ च्या मार्च तिमाहीसाठी लायसन्स शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्काची सुमारे ४५० कोटी रुपयांची प्रलंबित थकबाकी भरली आहे. वोडाफोन आयडियाने जुलैपर्यंत लायसन्स शुल्क म्हणून सुमारे ७७० कोटी रुपये आणि गेल्या वर्षीच्या लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमचा पहिला हप्ता म्हणून १,६८० कोटी रुपये भरायचे होते. मात्र, कंपनीने स्पेक्ट्रम पेमेंट पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत मागितली आहे.

कंपनी सप्टेंबरपर्यंत लायसन्स शुल्क भरण्याचीही तयारी करत आहे.
स्पेक्ट्रम हप्त्याचे उशीरा पेमेंट केल्यास शिल्लक रकमेवर वार्षिक आधारावर १५ टक्के व्याज लागू होईल.
पीटीआयने सांगितले की स्पेक्ट्रम हप्त्यासाठी सुमारे १,७०० कोटी रुपये आणि व्याजासह परवाना शुल्कासाठी
सुमारे ७१० कोटी रुपये द्यावे लागतील. सप्टेंबरपर्यंत एकूण २,४०० कोटी रुपये भरायचे आहेत. (Share Market)

सतत कमी होत आहेत ग्राहक
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आपल्या मासिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, देशातील टेलिफोन ग्राहकांची
संख्या यावर्षी जूनमध्ये मासिक आधारावर ०.११ टक्क्यांनी वाढून ११७.३९ कोटींवर पोहचली, जी मेमध्ये ११७.२६ कोटी होती.
मात्र जी वाढ झाली तिचा फायदा सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएल, एमटीएनएल आणि खाजगी कंपनी वोडाफोन
आयडियाच्या संख्येत घट झाल्याने मिळू शकला नाही. आकडेवारीनुसार, बीएसएनएलने १८.७ लाख, व्होडाफोन
आयडियाने १२.८ लाख आणि एमटीएनएलने १.५३ लाख ग्राहक गमावले.

डिस्क्लेमर : वर दिलेली माहिती आणि शिफारसी वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांच्या आहेत,
‘पोलिसनामा’च्या नाहीत. आम्ही गुंतवणुकदारांना सल्ला देतो की, गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी
अधिकृत तज्ञांशी संपर्क साधावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | वाढदिवसाचा केक न स्वीकारल्याने तरुणीला घरात घुसून मारहाण, एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्य; कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटी मधील घटना