Pune Crime News | वाढदिवसाचा केक न स्वीकारल्याने तरुणीला घरात घुसून मारहाण, एकतर्फी प्रेमातून तरुणाचे कृत्य; कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटी मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) एका तरुणाने तरुणीच्या वाढदिवसादिवशी तिच्या घरी कुरीयरने केक पाठवला. मात्र, तरुणाने केक न स्वीकारल्याने संतापलेल्या तरुणाने थेट तरुणीचे घर गाठले. त्याने तरुणीला घरात घुसून मारहाण (Beating) केली. याच दरम्यान तरुणाने तरुणीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग (Molestation) केला. हा प्रकार (Pune Crime News) उंड्री येथील एका उच्चभ्रू सोसायटीत (Elite Society) 24 ऑगस्ट रोजी रात्री घडला.

याबाबत 30 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अंकित सिंग Ankit Singh (वय-31 रा. केशवनगर, मांजरी रोड, आनंदनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 354 (ब), 354 (ड), 452, 352, 323 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने पीडित तरुणीच फोन नंबर घेऊन तिला कॉल करुन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतरी तो वेगवेगळ्या नंबरवरुन तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार मे 2022 पासून सुरु होता.

दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी तरुणीच्या वाढदिवसादिवशी (Birthday)
आरोपीने तिच्या घरी कुरिअरने केक पाठवला होता. मात्र, तिने तो केक स्वीकारला नाही.
याचा राग आल्याने आरोपीने थेट तरुणी राहत असलेल्या सोसायटीमध्ये गेला.
त्याठिकाणी सुरक्षारक्षकासोबत वाद घालून तो पीडितेच्या घरात घुसला. त्याने फिर्य़ादी तरुणीला हाताने मारहाण केली. या झटापटीत फिर्य़ादीच्या अंगावरील कपडे ओढले गेल्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न झाली. पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना