74 वर्षीय अभिनेत्री शर्मिला टागोरने मुलगी सोहासोबत केला रॅम्प वॉक ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शर्मिला टागोर आपली मुलगी सोहा अली खान सोबत रॅम्प वॉक करताना दिसल्या. दोघीही खूप सुंदर दिसत होत्या. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघींनीही ब्लू कलर घातला होता. खूप रॉयल अंदाजात त्या रॅम्प वॉक करताना दिसल्या.

आईसोबत रॅम्पवॉक करत सोहा खूपच खुश उत्साही दिसत होती. तिने इव्हेंटचा एक फोटो शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे. फोटो शेअर करताना सोहा म्हणाली, “अनेक वर्षांनंतर आईसोबत रॅम्प वॉक करून खूप खुश आहे. आम्ही आसामच्या संजुक्ता दत्ताच्या समर्थनार्थ हा रॅम्प वॉक केला आहे.”

सोहाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. शर्मिला टागोर यापूर्वीही रॅम्प वॉक करताना दिसल्या आहेत. यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी रॅम्प वॉक केला आहे. यावेळी त्या खूपच सुंदर दिसत होत्या. चाहत्यांना त्यांचा हा लुक खूपच आवडला होता.

https://www.instagram.com/p/B085qQcHrE2/?utm_source=ig_embed

visit : policenama.com