Shashikant Shinde | साताऱ्यातील शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे अडचणीत, आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, अटकेची शक्यता

नवी मुंबई : Shashikant Shinde | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) सातारा लोकसभेचे (Satara Lok Sabha) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी (Cheating Fraud Case) गुन्हा दाखल आहे. एफएसआय प्रकरणात (FSI Case) हा गुन्हा दाखल झाला असून शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी शौचालय घोटाळ्याचा गुन्हा देखील शिंदे यांच्यावर दाखल झाला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.(Shashikant Shinde)

नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी येथील मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे
(Mumbai Krushi Utpanna Bazar Samiti) २४ संचालक आणि सचिव असे २५ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात
(APMC Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. मसाला मार्केटमधील ४६६ गाळे धारकांना जादाचा एमएसआय
देताना एपीएमसी प्रशासनाचे ६५ कोटी रूपयांचे नुकसान केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

२००९ साली मसाला मार्केटमधील ४६६ गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी ६०० रूपये प्रति चौरस फुटाने
परवानगी त्या वेळच्या संचालक मंडळाने दिली होती. रेडीरेकनरचा दर ३०६६ रूपये असताना फक्त ६०० रूपये आकारले
गेल्याने शासनाचे ६२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह इतर संचालकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो