Video : शर्लिन चोप्राचा OTT प्लॅटफॉर्म ‘रेडशेर’ चाहत्यांमध्ये होतोय पॉप्युलर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री शर्लिन चोप्राने आपला ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली. शर्लिन चोप्राने एका आठवड्यात 10 पेक्षा जास्त फॉलोवर्सची नोंद केली आहे. रेडशेर असं तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव आहे. रेडशेरवरील मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहेत.

शर्लिनने यापूर्वीही बराच कन्टेन्ट रिलीज केला आहे जो पाहणे अत्यंत रंजक आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या शॉर्ट फिल्मचे नाव “अंडर द स्किन”, “लुजिंग कंट्रोल” आणि इतरही काही आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॉलिवूडमधील अनेक प्रकल्पांमध्ये काम केले आहे, परंतु तिने स्वतःचा उपक्रम सुरू करण्याचा आणि एक शक्तिशाली उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. रेडशेर हा एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे ज्याची निर्मिती शर्लिन चोप्राने केली आहे.

शर्लिनच्या निर्भय वृत्तीने तिला नेहमीच सर्वांपेक्षा वेगळं जाणवून दिले आहे. प्ले बॉयच्या कव्हर पेज वर येणारी ती पहिली भारतीय मॉडेल आहे. शर्लिनला तिच्या फिटनेसाठीदेखील ओळखले जाते परंतु आता शर्लिन तिच्या आयुष्यात पुढे आली आहे आणि एक उद्योजक बनली आहे, एक अभिनेत्री असून आता ती निर्माता, लेखक आणि कन्टेन्ट रायटर सुद्धा आहे.