शिखर धवन बनला ५ हजारी मनसबदार

नेपियर : वृत्तसंस्था – मिशांवर पीळ देणारा आणि झेल घेतल्यावर मांडीवर थाप मारुन समोरच्याला आव्हान देणारा आघाडीचा फलंदाज शिखर धवन पाच हजारी मनसबदार बनला आहे.

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या वन डे सामन्यात शिखर धवन याने आपल्या १० धावा पूर्ण करत वन डे किक्रेटमध्ये आपल्या ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. वन डेमध्ये ११८ डावांमध्ये धवन याने हा टप्पा पार केला आहे.  वन डे किक्रेटमध्ये कमीतकमी डावात ५ हजार धावा करणाऱ्या ब्रहन लारा याच्याशी त्याने बरोबरी करीत चौथा क्रमांक पटकावला आहे. शिखर धवन याचा स्टाईक रेट सध्या ९३ टक्के आहे.

दक्षिण अफ्रिकेचा आघाडीचा खेळाडू हशिम आमला याने केवळ १०१ डावांमध्ये ५ हजार धावा केल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ वेस्ट इंडिजला दोनदा विश्व चषक मिळवून देणाऱ्या व्हिव्हियन रिर्चडसचा क्रमांक लागतो. त्याने व विराट कोहली या दोघांनी ११४ डावांमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या सर्वांच्या पंगतीत आता शिखर धवन जाऊन बसला आहे.

मोहम्मद शमीने ‘हा’ विक्रम केला स्वत:च्या नावावर